१९९१ पासून दरसाल, ३० सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन साजरा केला जात असतो. बायबलचे हिब्रू भाषेतून लॅटीन भाषेत भाषांतर करणारे संत जेरोम, ह्यांना आद्य भाषांतरकार म्हटले जाते. त्यांच्या स्मृतीदिनी (फिस्ट ऑफ द सेंट), म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी, हा जागतिक भाषांतर दिन साजरा केला जात असतो. भाषांतरकारांची आंतरराष्ट्रीय संघटना (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्स्लेटर्स), १९५३ साली झालेल्या तिच्या स्थापनेपासून, केवळ ख्रिश्चनच नव्हे तर सर्वच देशांतील भाषांतर व्यवसायाच्या प्रगतीस सहसंवेदना व्यक्त करण्यासाठी, हा दिवस साजरा करत असते. वाढत्या जागतिकीकरणाच्या युगात वाढते महत्त्व प्राप्त करत असणार्या ह्या व्यवसायास, अभिमान अभिव्यक्त करण्याची ही एक संधीच असते.
’अमृताते पैजा जिंके”’ असे जिचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केलेले आहे, त्या मराठी भाषेसही भाषांतरकौशल्याचा खूप संपन्न वारसा लाभलेला आहे. श्रीमद् भगवद् गीतेचा विनोबाजींनी (विनायक भावे ह्यांनी) केलेला ’गीताई” हा अनुवाद तर ह्या सार्या अनुवादांत शीर्षस्थ आहे. हरी नारायण आपटे ह्यांनी केलेला ’साम ऑफ लाईफ’ ह्या हेन्री वर्डस्वर्थ लाँगफेलो ह्या प्रख्यात इंग्लिश कवीच्या कवितेचा मराठी अनुवाद ’जीवित महिमा' अत्यंत वाचनीय आहे.
This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
0 comments:
Post a Comment